• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई बाजूस दोन वाहनांचा भीषण अपघात सुदैवाने चालक बचावला

ByEditor

Nov 16, 2024

खोपोली : आज दि.15/11/2024 रोजी सकाळी 7.30 वा.चे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे मुंबई लेनवर किमी 40.100 येथे अपघात झाला. टेम्पो क्र. MH 05 DK 8062 वरील चालक अफसर अली खान (वय 28 रा.जरीमरी, अंधेरी, एअरपोर्ट रोड, मुंबई) हा आपला टेम्पो पुणेकडून मुंबई दिशेने घेऊन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्याची धडक समोरील ट्रक क्र. MH 46 CL 16660 ला बसली. या अपघातात टेम्पोची केबीन दबल्याने चालक केबीनमध्ये अडकून पडला होता. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या सर्वांनी मिळून दोन क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!