• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा

ByEditor

Nov 19, 2024

वृत्तसंस्था
विरार :
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची सोमवारी सांगता झाली. उद्या बुधवारी मतदान होणार असून या मतदानापूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विरार येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी तब्बल पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये तावडे यांनी पैसे वाटले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केला. यामुळे भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.

राज्यात विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक राहिले आहे. त्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडत आहे. बहुजून विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार आज मंगळवारी विनोद तावडे ही विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत होते. तब्बल पाच कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे बहुजन विकास आघाडीने म्हटलं आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं. यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.

https://twitter.com/rautsanjay61/status/1858782041799590063

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!