• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान

ByEditor

Nov 19, 2024

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9.70 कोटींहून अधिक मतदारांसाठी 1 लाख मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत एकाच टप्प्यात होणार असून मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. उद्या मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!