• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

ByEditor

Dec 10, 2024

मुंबई : कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या अपघातात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 49 जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात बस चालकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला आहे. तर, बेस्ट बस मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरल्याने अनेकांना धडक दिली. घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा करण्यात आला आहे. या दरम्यान बस चालकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरे हा 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचे वय 54 वर्ष असून तो याआधी अन्य ठिकाणी कामाला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बस चालकाने या आधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलं आहे. बस चालक संजय मोरेवर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना महापालिकेच्या भाभा रुग्णालय आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचे सीसीटिव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे. यात स्टॉपवर नागरिक उभे असताना अचानक एक भरधाव बस जाताना दिसते. या बसच्या पुढे असलेल्या एका रिक्षाला धडक देऊन तिला फरफटत नेताना दिसत आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबजलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर हा अपघात घडला. गर्दीच्या ठिकाणी अचानक भरधाव वेगात बस शिरली आणि त्यामुळं अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्याचं सांगितलं जातं. तर, काही जण चालकाची चुकी असल्याचं म्हणत आहे. मात्र, अद्याप काहीच ठोस माहिती समोर आली नाही.

By Editor

4 thoughts on “Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे”
  1. Pretty nice post. I just stumbled upon your weblog and wanted to say that I have really enjoyed surfing around your blog posts. After all I抣l be subscribing to your feed and I hope you write again soon!

  2. Hi there this is somewhat of off topic but I was wanting to know if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML. I’m starting a blog soon but have no coding know-how so I wanted to get advice from someone with experience. Any help would be greatly appreciated!

  3. Thanks for the tips you share through this blog. In addition, numerous young women that become pregnant tend not to even seek to get health care insurance because they fear they won’t qualify. Although some states currently require that insurers present coverage irrespective of the pre-existing conditions. Charges on these guaranteed plans are usually larger, but when considering the high cost of medical care bills it may be your safer way to go to protect your own financial future.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!