• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विजेचा शॉक लागून घोटवळ येथील तरुणाचा मृत्यू

ByEditor

Dec 12, 2024

विश्वास निकम
कोलाड :
माणगाव तालुक्यातील घोटवळ येथील योगेश मारुती फराडे (३८) या तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोलाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. १०/१२/२०२४ रोजी मयत इसम हा मौजे धगडवाडी, ता. रोहा येथे पोलावर नवीन तार टाकण्याचे काम करीत असतांना त्याला विजेचा शॉक लागल्याने त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्याच्या मृत्यूची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात १६/२०२४ बीएनएसएस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा रोहा पोलीस ठाण्याचे पोसई खतीब यांनी केला असुन अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एन. ए. शिर्के, अंमलदार सी. जी. कुथे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!