• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दोन वर्षापुर्वी हरविलेल्या मुकबधीर युवतीचा गुजरात राज्यातुन घेतला पेण पोलीसांनी शोध

ByEditor

Dec 12, 2024

विनायक पाटील
पेण :
बेपत्ता झाल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलीस ठाण्यात येतात. असंच एक प्रकरण. दि. २१/१२/२०२२ रोजी पेण शहरात राहणारी मालता चिंधू साटम (वय ३०, रा. लोखंडे यांची चाळ, दातारआळी ता. पेण, जिल्हा रायगड) ही जन्मतः मुकी असल्याने ती अचानक घरातुन निघून गेल्याबाबत पेण पोलीस ठाण्यात तिची आई वंदना चिंधु साटम हीने तक्रार दिली होती. त्यानुसार पेण शहर तसेच आजुबाजूच्या परीसरामध्ये तिचा शोध घेतला असता ती कोठेही मिळुन आली नाही. तिच्या उजव्या हातावर तिचा भाउ लक्ष्मण साटम यांचा मोबाईल नंबर गोंदविण्यात आला होता. परंतु, तो तिच्या हातावर व्यवस्थित उमटलेला नसल्याकारणाने तिचा शोध लागु शकला नाही.

महाराष्ट्र राज्य तसेच आजुबाजुच्या राज्यामध्ये तपास सुरु असताना तब्बल दोन वर्षांनी पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे सदर बेपत्ता युवती ही गुजरात राज्यामध्ये असल्याबाबत नारी संरक्षण केंद्र खुंद, तालुका चिखली, जिल्हा नवसारी, गुजरात येथुन तिच्या नातेवाईकांची ओळख पटवून मालता हिस दि. १०/१२/२०२४ रोजी ताब्यात घेवून आई वंदना चिंधु साटम हिच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले.

रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मिसींगचे तपासकामी पोलीस हवालदार सतिश भालचंद्र पाटील, महिला पोलीस प्रिया प्रमोद पाटील, स्वरा शिरीष पाटील यांनी उल्लेखनीय कामगीरी केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!