• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

ByEditor

Dec 15, 2024

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज नागपुरात विस्तार झाला. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या आमदारांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. महायुतीच्या ३९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असून अनेक नव्या चेहऱ्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. १९९१ नंतर ३३ वर्षांनी २०२४ मध्ये मुंबईऐवजी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.

पाहा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण, संपूर्ण यादी –

भाजपच्या या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ –
१. गिरीश महाजन
२. चंद्रकांत पाटील
३. पंकजा मुंडे
४. राधाकृष्ण विखे पाटील
५. चंद्रशेखर बावनकुळे
६. मंगलप्रभात लोढा
७. जयकुमार रावल
८. नितेश राणे
९. शिवेंद्रसिंह राजे भोसले
१०. पंकज भोयार (राज्यमंत्री)
११. गणेश नाईक
१२. मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)
१३. माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
१४. अतुल सावे
१५. संजय सावकारे
१६.आकाश फुंडकर
१७. अशोक उईके
१८. जयकुमार गोरे
१९. आशिष शेलार

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील या मंत्र्यांना मंत्रिपद –

२०. संजय शिरसाठ
२१. गुलाबराव पाटील
२२. दादा भुसे
२३. उदय सामंत
२४. शंभुराज देसाई
२५. योगेश कदम (राज्यमंत्री)
२६. प्रकाश आबिटकर
२७. प्रताप सरनाईक
२८. आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
२९. भरत गोगावले
३०. संजय राठोड

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री –
३१. नरहरि झिरवळ
३२. हसन मुश्रीफ
३३. धनंजय मुंडे
३४. अदिती तटकरे
३५. बाबासाहेब पाटील
३६. दत्तात्रय भरणे
३७. मकरंद पाटील
३८. इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
३९. माणिकराव कोकाटे

कोणाकोणाला डच्चू?

सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!