आंबोली येथील रहिवासी शिवाजी चव्हाण यांचे भुमीलेख कार्यालयासमोर उपोषण
वार्ताहर
सावंतवाडी : माहीती अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयात माहिती अधिकारामार्फत विनंती अर्ज करुनही प्राॅपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबतची माहितीची मागणी करुनही कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिल्याबद्दल आंबोली जकातवाडी येथील रहिवासी शिवाजी गोविंद चव्हाण हे भूमी अभिलेख कार्यालय सावंतवाडी येथे १७ डिसेंबर रोजी आज उपोषणाला बसले आहेत.
यावेळी माहिती देताना शिवाजी चव्हाण यांनी सांगितले की, माझ्या मागणीप्रमाणे माझ्या प्रॉपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबत माहिती मला उपलब्ध करुन न दिल्याने मला नाईजालास्तव दि. १७/१२/२०२४ पासून उपोषणास बसावे लागले आहे. माझ्या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी हेच जबाबदार राहणार आहेत, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.