• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू

ByEditor

Dec 18, 2024

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. एलिफंटाकडे जाताना बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ प्रवासी बोट बुडालीय. नीलकमल नावाची ही बोट गेट वे वरुन एलिफंटाला निघाली होती. त्याचवेळी एका नेव्हीच्या स्पीडबोटनं धडक दिली. या धडकेमुळं बोट बुडाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी नेव्हीच्या बचावनौका दाखल झाल्या. 110 प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. 104 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.. पण दुर्घटनाग्रस्त बोटीतील 4 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्तवली आहे.

“अरबी समुद्रात बुचर आयलँडजवळ निलकमल कंपनीच्या प्रवीस बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. 3 वाजून 55 मिनिटांनी ही घटना घडली आहे. निलकमल बोटीच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजीत सिंह यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सायंकाळी 7.30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये 3 नौदलाचे आणि 10 नागरिक आहेत. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, “या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हातात घेतलं. 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरु आहे. त्यामुळे अंतिम माहिती उद्यापर्यंत हाती येईल. शासनाच्या सर्व यंत्रणांना कामी लागल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाईल. तसंच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी शासनाच्या आणि नौदलाच्या वतीने केली जाईल”.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!