• Wed. Apr 9th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खारपाडा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

ByEditor

Dec 19, 2024

विनायक पाटील
पेण :
खारपाडा भगत नगर येथे भरवण्यात आलेल्या रोजगार मेळावा मध्ये अनेक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याने लायन्स क्लब ऑफ पनवेल क्लबचे पदाधिकारी यांचे कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा रश्मी भगत यांनी आभार मानले.

लायन्स क्लब ऑफ पनवेल व कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा भगत नगर दत्त मंदिर सभागृह येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन पेणचे नायब तहसीलदार नितीन परदेशी यांच्या हस्ते गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवून करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा कै मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रथालय अध्यक्ष दयानंद भगत, लायन्स जिल्हा समवयक ज्योती देशमाने, लायन्स आर सी रिझन सुयोग पेडसे, लायन्स क्लब पेण अध्यक्ष प्रदीप पाटील, लायन्स सचिव अशोक गिल्डा, लायन्स खजिनदार मनोज म्हात्रे, लायन्स कॉडिओतर प्रमोद गजहंस, लायन्स प्राईड पेण शशिकांत भगत, शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे, पेण तालुका शिक्षक मतदार संघाचे अध्यक्ष नथुराम म्हात्रे, जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे, विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष गणेश घरत, जिते माजी उपसरपंच डी. डी. म्हात्रे, जिते माजी उपसरपंच संदेश ठाकूर, मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत, रमेश घरत, अनिता भगत, हिरामण घरत, अरुण घरत, हसुराम ठाकूर, प्रकाश ठाकूर, भालचंद्र भगत, मालती म्हात्रे, मेघा पाटील, कुंदा ठाकूर, परशुराम घरत, रमेश पाटील, रोशन घरत, कैलास रुठे, बाळू रामा घरत, किशोर ठाकूर, विराज भगत, सुजित ठाकूर, चंदू पाटील, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी 200 शुशिक्षित बेरोजगार यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी 22 बेरोजगारांना नोकरी देण्यात आली. MIDC पातळगंगा रसायनी तसेच बेलापूर येथील १३ कंपनी या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. रोजगार मेळाव्यात येऊन आपले अर्ज दाखल केलेल्या बेरोजगार यांना लवकरच नोकऱ्या देण्यात येणार आहेत.

रोजगार मेळावा खारपाडा परिसरात होणेसाठी तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी लायन्स क्लब फॉर पनवेल अध्यक्ष एम. जी. चव्हाण यांना विनंती केली आणि रोजगार मेळावा यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेतर्फे कंपनीच्या प्रतिनिधींना सन्माचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!