• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

झोपताना तुमचा फोन जवळ ठेवता तर सावधान…! किती अंतरावर असावा फोन? जवळ असल्यास भयंकर नुकसान?

ByEditor

Jan 2, 2025

रायगड जनोदय ऑनलाईन
आजकाल स्मार्टफोन म्हटलं तर जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्याच्या युगात जवळपास सर्वच कामं मोबाईलच्या माध्यामातून करणे सोपे झाले आहे. ज्यामुळे लोक दैनंदिन जीवनात सुद्धा फोन आपल्यापासून दूर ठेवत नाही. पण तुम्हाला माहितीय का? स्मार्टफोन तुमच्यासाठी किती धोकादायक आहे? याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, अनेकजण स्मार्टफोनचा वापर जेवताना़ही करतात. तर काही लोक झोपताना फोनचा वापर करतात, जर तुम्हालाही झोप येत असूनही मोबाईल पाहत असाल तर काळजी घ्या कारण असे करणे धोकादायक ठरू शकते. झोपताना आपला फोन आपल्यापासून किती अंतरावर असावा? तो जवळ असल्यास काय नुकसान होऊ शकते? हे प्रत्येकाला माहित असले पाहिजे. जाणून घ्या…

झोपताना फोन कुठे ठेवायचा?

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिस्थिती अशी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात फोन दिसतो, ज्याचा ते तासनतास वापर करत असतात. बरेच फोन वापरकर्ते दिवसभर इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर शॉर्ट्स स्क्रोल करत असतात. तर, काही लोकांसाठी फोनचा वापर व्यावसायिक कामासाठी आहे ज्यामुळे ते 24 तास फोन सोबत ठेवतात.

स्मार्टफोनचा वापर खूप धोकादायक?

काही लोक कामासाठी किंवा व्यसनाधीनतेमुळे आपला फोन जास्त वापरत आहेत, परंतु प्रत्यक्षात स्मार्टफोनचा वापर आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. काही लोक झोपताना डोक्यावर किंवा हातावर फोन ठेवून झोपतात, पण याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि फोन कोणत्या प्रकारे हानिकारक ठरू शकतो? याबाबत अनेकांना माहित नाही. सविस्तर जाणून घेऊया की फोन वापरणे धोकादायक कसे ठरू शकते? झोपेत फोन ठेवणे कितपत योग्य आहे?

स्मार्टफोन तुमच्यासाठी किती धोकादायक आहे?

आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्मार्टफोन अत्यंत धोकादायक आहे. त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून, शक्य तितक्या दूर ठेवा. फोन तुमच्यापासून शक्यतो दूर ठेवा. दिवसभर फोन स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर विशेष प्रभाव पडतो, ज्यामुळे दृष्टी कमकुवत होते. इतकंच नाही तर फोनचा अतिवापर देखील झोपेशी संबंधित समस्यांचे कारण मानला जातो. फोनच्या अतिवापरामुळे मानसिक तणाव वाढतो आणि काही लोकांमध्ये स्मृतीभ्रंशही दिसून आला आहे.

झोपताना फोन ठेवण्यासाठी योग्य जागा कुठे आहे?

काही लोक फोन वापरत असताना ते आपल्या आजूबाजूला ठेवतात, पण हे योग्य नाही. फोन स्वतःपासून ३ ते ४ फूट अंतरावर ठेवून झोपावे. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमचा फोन उशीखाली, हाताजवळ किंवा बेडवर कुठेही ठेवून झोपलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

रात्री तुमचा फोन वापरताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकता?

झोपताना फोन वापरणे स्वीकार्य मानले जात नाही. झोपेच्या २ ते ३ तास ​​आधी फोन किंवा इतर गॅजेट्सपासून दूर राहण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. मात्र, तरीही काही कारणास्तव तुम्हाला फक्त रात्रीच फोन पाहण्याची वेळ मिळत असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन त्याचा वापर करू शकता.

  • फोन स्क्रीन आणि डोळे यामध्ये अंतर ठेवा.
  • नाईट मोडसह फोन वापरा.
  • डोळे मिचकावल्याशिवाय सतत फोन वापरू नका.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा करत नाही.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!