• Mon. May 5th, 2025 12:20:02 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा हे बदल, आजार राहतील चार हात दूर

ByEditor

Jan 3, 2025

निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण निरोगी आणि खाण्या योग्य समजतो ते दररोज खाल्ल्यास काही आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा आपण पॅकिंग फूड आणि फास्टफूडचा आहारात समावेश करतो पण ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे आहारात काही बदल करणे आवश्यक आहेत. तज्ञांकडून जाणून घेऊया आहारात कोणते बदल करणे आवश्यक आहेत.

रायगड जनोदय ऑनलाईन
आपल्या आरोग्याचा थेट संबंध आपल्या आहाराशी येत असतो. आजकाल आपला खाण्याच्या सवयी अशा झाल्या आहेत की त्या रोगांचे कारण बनतात. अनेकवेळा आपण विचार न करता अनेक गोष्टी खातो त्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते.हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते असे आरोग्य तज्ञ सांगतात. श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट दिल्ली येथील डॉक्टर अरविंद अग्रवाल म्हणतात की आजच्या अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपले शरीर हे हळूहळू रोगांचे घर बनत आहे. आहारामध्ये अनेकदा जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता आहे. आहारातील कोणते खाद्यपदार्थ बदलले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया तज्ञांकडून.

तज्ञांच्या मते मैदा, ब्रेड, बर्गर आणि पिझ्झा यासारख्या गोष्टी तुमच्या शरीराला हानी पोहोचवत असतात. या गोष्टींपेक्षा संपूर्ण धान्यांपासून बनवलेल्या गोष्टी जसे की मल्टीग्रेन ब्रेड आणि घरी बनवलेली पोळी किंवा पराठे खाणे आणि फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा देखील येवू शकतो. साखर खाण्याऐवजी तुम्ही गुळ किंवा मधाचे सेवन करू शकतात. तसेच पॅकिंगच्या ज्यूस ऐवजी तुम्ही फळांचा रस किंवा नारळ पाणी, लिंबू पाणी पिऊ शकतात. समोसा फास्ट फूड खाण्याऐवजी हरभरे, मखाना किंवा ड्रायफ्रूट्स खाणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

या गोष्टींची ही घ्या काळजी

नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले तसेच पॅकबंद असलेले पदार्थ खाणे टाळा. या पदार्थांमध्ये प्रिज़र्वेटिव आणि जास्त मीठ असते ते शरीराला हानी पोहचवू शकतात. तसेच पांढरा तांदूळ वापरण्याऐवजी ब्राऊन राईस किंवा क्विनोआचे सेवन करा.

साध्या मिठाऐवजी सेंदी मीठ वापरा. बाजारातील मिठाई खण्याऐवजी आरोग्यदायी घरगुती पदार्थ जसे की रव्याची खीर किंवा गुळाची मिठाई खा. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. या छोट्या छोट्या गोष्टीत बदल केल्याने आरोग्याला याचा फायदा होईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!