• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

औषधं न खाताच रातोरात सर्दी, कफ, खोकला होईल गायब, वापरा ‘हे’ साधेसोपे उपाय

ByEditor

Aug 14, 2025

रायगड जनोदय ऑनलाईन
सर्वात जास्त त्रासदायक ठरतं, तो म्हणजे सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि जरा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले व्यक्ती यांना या दिवसात गळ्याला खवखव होणं, नाक वाहणं, शिंका येणं किंवा खोकल्याने त्रस्त होणं हे फारच सामान्य होतं. औषधांवर अवलंबून राहणं सगळ्यांनाच आवडत नाही. मग अशावेळी आयुर्वेदिक आणि पारंपरिक घरगुती उपायांचा आधार घेतला, तर परिणाम फक्त तात्पुरता राहत नाही.

तर त्रास मुळापासून कमी होतो. हे उपाय शरीरात उष्णता निर्माण करून सर्दी-खोकल्याशी लढतात आणि प्रतिकारशक्तीही वाढवतात. जाणून घेऊया असेच काही प्रभावी उपाय जे या पावसाळ्यात तुमचं आरोग्य सांभाळतील, तेही कोणतंही साइड इफेक्ट न होता.

आले-मधाचा चमत्कारीक उपाय

जेव्हा गळा खवखवतो, नाक गळतं आणि बोलायला त्रास होतो, तेव्हा गरम चहा ऐवजी आले आणि मधाचं मिश्रण अधिक फायदेशीर ठरतं. आलेमध्ये सूज कमी करणारे घटक असतात आणि मध गळ्याला मऊपणा देतो. यामुळे एक चमचा ताजा आल्याचा रस आणि एक चमचा शुद्ध मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास गळ्याच्या तक्रारी कमी होतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घेतल्यास झोपही शांत लागते आणि सकाळी उठल्यावर खोकला कमी झाल्याचं जाणवतं.

वाफ घेण्याचा विसरू नका उपाय

नाक बंद होणं, डोकं जड वाटणं आणि छातीत दडपण जाणवणं हे सर्दीचे सुरुवातीचे लक्षणं असतात. अशावेळी वाफ घेणं म्हणजे सर्वात जुना आणि प्रभावी उपाय ठरतो. गरम पाण्यात थोडंसं विक्स किंवा काही पुदिन्याची पानं घालून घेतलेली वाफ श्वसन मार्ग मोकळा करते. दररोज दोन वेळा ७-८ मिनिटं वाफ घेतल्यास छातीत साठलेलं स्राव कमी होतं, नाक साफ राहतं आणि झोप चांगली लागते. हा उपाय विशेषतः संध्याकाळी केला तर संपूर्ण रात्री आराम मिळतो.

तुळस-काळी मिरीचा काढा

प्रत्येक घरात कधीकाळी आजीबाईनी तुळस आणि काळी मिरीचा काढा दिलाच असेल. हा काढा म्हणजे रोगप्रतिकारशक्तीचा नैसर्गिक बूस्टर आहे. एका कप पाण्यात ५ तुळशीची पानं, ३ काळी मिरी आणि थोडंसा आले टाकून चांगलं उकळा. नंतर गाळून त्यात थोडा मध घाला. कोमट असतानाच प्या. हा काढा दिवसातून एकदोन वेळा घेतल्यास शरीरात उष्णता निर्माण होते, विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात आणि सर्दी-खोकल्याला आळा बसतो.

गुळ-हळदीचं गरम पेय

पावसाळ्यात गुळ आणि हळदीचं पेय ही अजून एक गुणकारी जोड आहे. हळदीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि गुळातील उष्णतेचा गुण एकत्र येऊन गळा स्वच्छ करतात. एका कप गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि थोडा गुळ टाकून सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास गळा सॉफ्ट होतो. शिवाय अंगदुखीवरही आराम मिळतो. विशेषतः थंडी वाढली असेल, तर हा उपाय एकदा करून पाहाच.

पावसात विशेष काळजी

उपाय करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच काही गोष्टी टाळणंही गरजेचं असतं. पावसात थंड पाणी, आइस्क्रीम, दही किंवा फ्रीजमधील पदार्थ खाणं टाळा. घरात पंखा किंवा एसी थेट अंगावर नको. ओले कपडे वेळेवर बदलणं, गरम पाणी पिणं आणि अंग झाकून ठेवणं हे सुद्धा सर्दीपासून वाचण्याचे मार्ग आहेत. कारण अशा काळात शरीराचं तापमान कमी झालं, की संसर्ग पटकन होतो.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!