दिघी : म्हसळा तालुक्यातील काळसूरी – तुरुंबाडी मार्गावर बुधवारी जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ता खचला. धोकादायक वळणदार रस्ता खचल्याने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे व बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार लुंगे यांच्याकडून तात्काळ दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच दखल घेतल्याने येथील प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला. ( छाया – गणेश प्रभाळे )