• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

13 फेब्रुवारीला राजन साळवींचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ByEditor

Feb 9, 2025

रत्नागिरी : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला लवकरच एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांच्या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे. राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. मात्र, राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही, असं मोठं विधान किरण सामंतांनी केलं आहे. तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणालेत. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चेतच साळवींच्या नावाला विरोध सुरु असल्याचं एका अर्थानं दिसून येतंय. साळवींचा सहज पक्षप्रवेश सध्या कठीण झाल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे 13 फेब्रुवारीला राजन साळवींचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

राजन साळवी यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.13 फेब्रुवारीला राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा पक्षप्रवेश लांबला होता. त्यानंतर आता अखेर 13 फेब्रुवारी चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. राजन साळवी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोकणाकडून मुंबईकडे रवाना होत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!