श्री. आशिष सेठी,
हेड- हेल्थ एसबीयू आणि ट्रॅव्हल,
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स
रस्ते अपघात असो की घराला आग लागणे किंवा केळीच्या सालीवरुन पाय घसरणे अशा घटना नियमित आपल्या अवतीभोवती घडत असतात. हे अपघात अचानक आणि अनपेक्षित असतात. जे रस्त्यावर, घरी किंवा कामाच्या ठिकाणी घडतात. बहुतांश वेळा ते आपल्या नियंत्रणा बाहेर असतात. आपण सर्व प्रकारची काळजी घेऊनही अपघाताच्या घटना टाळता येत नाहीत. ज्यामुळे हॉस्पिटलायझेशन, अपंगत्व किंवा प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या अनिश्चित स्थितीमुळे नेहमी दक्ष राहण्याचे आणि सज्जतेचे महत्व अधोरेखित होते. अशा घटनांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स महत्वाची भूमिका बजावतो. कठीण काळात मोलाचाआर्थिक दिलासा मिळतो. यामुळे तुमच्या प्रियजनांना सुरक्षा प्रदान करताना कोणताही अनपेक्षित खर्च हाताळण्यासाठी तुम्ही सज्ज असल्याची खात्री मिळते. पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स म्हणजे काय आणि तुमच्यासाठी नेमका काफायदेशीरआहे हे समजून घेऊया.
पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स हे परिपूर्ण इन्श्युरन्स कव्हर आहे. ज्यामुळे बाह्य, दृश्यमान, हिंसक आणि आकस्मिक घटनांमुळे होणाऱ्या कोणत्याही शारीरिक दुखापतीला संरक्षण मिळते. याद्वारे तुम्हाला अपघातापासून आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते. अपघात कधीही अन केव्हाही घडो, रस्ते अपघात असो की तुम्ही घरात पाय घसरुन पडला असाल किंवा खेळताना इजा झाली असेल तुम्हाला निश्चितपणे संरक्षण मिळते. अशा प्रकारचा इन्श्युरन्स हा बेनिफिट-पॉलिसी असतो. म्हणजेच तुम्ही निवडलेल्या समइन्श्युअर्डच्या आधारावर तुम्हाला किंवा तुमच्या नॉमिनीला पूर्व-निर्धारित रक्कम दिली जाते. विशेष बाब म्हणजे तुम्हाला लवचिकताही मिळते. जेणेकरुन तुमच्या विशिष्ट गरजा आणि परिस्थितीच्या अनुरुप कव्हरेज निर्मिती करणं तुम्हाला शक्य ठरते.
चला या इन्श्युरन्स प्रॉडक्टच्या सर्व समावेशक कव्हरेज विषयी जाणून घेऊया :
अपघाती मृत्यू : अपघातामुळे पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास, पॉलिसी धारकाने पॉलिसी घेतेवेळी निवड केल्याप्रमाणे संपूर्ण सम-इन्श्युअर्ड इन्श्युररद्वारे अदा केली जाईल. पॉलिसीत नाव नमूद असलेल्या लाभार्थ्याला रक्कम अदा केली जाईल. या लंपसम रकमेतून अवलंबित व्यक्तीला नियमित आर्थिक पाठबळाची सुनिश्चिती मिळेल.
कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व : पॉलिसीधारकांना झालेल्या अपघाताच्याबाबतीत पॉलिसीच्या अटी व शर्तींमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे आजीवन पूर्ण अपंगत्व आल्यास, जसे की 2 अवयव गमावणे, दृष्टी गमावणे किंवा अन्य तत्सम बाबी. इन्श्युरन्स पॉलिसी ही पॉलिसीधारकाला पॉलिसी अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण समइन्श्युअर्ड अदा करेल. अशा स्थितीत, क्लेम रक्कमही समइन्श्युअर्डच्या तुलनेत 1.5 ते 2 पट असते. कारण कायमस्वरुपी अपंगत्वाच्या स्थितीत अधिक खर्चाला सामोरे जावे लागते. या वर्धित कव्हरेजची मर्यादा इन्श्युररनुसार बदलते.
कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व : जर पॉलिसीधारकाला अपघातामुळे आजीवन आंशिक अपंगत्व आले. जसे की एक अवयव गमावणे, एका डोळ्याचे नुकसान किंवा पॉलिसी डॉक्युमेंट अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे तत्सम बाबी ज्याद्वारे इन्श्युअर्डला वर्तमान उपजिविकेचे साधन सुरू ठेवणे अशक्य ठरते. अशा स्थितीत इन्श्युरन्स कंपनी समइन्श्युअर्डची पूर्व-सहमत टक्केवारी वितरित करते. सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे अधिकृत दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जाते. इन्श्युरन्स कंपनी अपंगत्वाचे प्रमाण/वर्गवारी आणि पेमेंट रक्कम निश्चित करतात.
तात्पुरते पूर्ण अपंगत्व : जर पॉलिसीधारकाच्या अपघातामुळे तात्पुरते पूर्ण अपंगत्व आले. म्हणजेच, पॉलिसीधारकत्यांचे नेहमीचे उपजिविकेचे काम करण्यास असमर्थ असेल तर पॉलिसी धारकाला पॉलिसीअंतर्गत साप्ताहिक किंवा मासिक निश्चित लाभ मिळेल. पॉलिसी धारकत्यांचे उपजिविकेचे काम सुरू करण्यासाठी पूर्णपणे रिकव्हर होईपर्यंत किंवा इन्श्युरन्स कराराअंतर्गत परिभाषित निश्चित लाभ दिला जाईल.
वर नमूद केलेल्या लाभा व्यतिरिक्त, ही इन्श्युरन्स पॉलिसी अनेक पर्यायी ॲड-ऑन कव्हर देखील ऑफर करते. जे तुम्ही वर्धित संरक्षणासाठी निवडू शकता.
हॉस्पिटलायझेशन वैद्यकीय खर्च : अपघातात झालेल्या शारीरिकदुखापतीतून रिकव्हर करण्यासाठी झालेला हॉस्पिटलायझेशन खर्च पॉलिसी कव्हर करेल.
मुलांचे शिक्षण लाभ : अपघातामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास पॉलिसी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी पूर्व-निर्धारित लाभ रक्कम प्रदान करेल.
उत्पन्नाची हानी : दुखापत ते रिकव्हरी या दरम्यानच्या कालावधीसाठी पॉलिसीद्वारे निश्चित रक्कम प्रदान केली जाईल. पॉलिसीधारकाला काम करणे अशक्य ठरते. त्यामुळे या कव्हरच्या माध्यमातून होणारी उत्पन्नाची हानी भरुन निघते.
लोन संरक्षण : पॉलिसीधारकास कायमस्वरुपी अपंगत्व किंवा अकाली मृत्यू झाल्यास हे ॲड-ऑन कोणतेही थकित लोन कव्हर करण्यासाठी लंपसम पेमेंट प्रदान करते. हे कुटुंबाचे आर्थिक बोजापासून संरक्षण करते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर्जाचा भार राहणार नाही याची सुनिश्चिती केली जाते.
तुमचे निवास किंवा वाहनात सुधारणा : अपंगत्व आलेल्या पॉलिसी धारकाची गतीशिलता आणि दैनंदिन सुलभता वाढविण्यासाठी त्याचे निवास किंवा वाहनात बदल करण्याची शिफारस वैद्यकीय व्यावसायिक करू शकतात. यामध्ये स्कूटरवर व्हील्स इंस्टॉल करणे किंवा एन्ट्री पॉईंटवर रॅम्प इंस्टॉल करणे, व्हीलचेअर ॲक्सेससाठी दरवाजा रुंदकरणे किंवा तत्सम स्वरुपाचे प्रस्तावित बदल समाविष्ट असू शकतात.
सर्जिकल लाभ, अपघाती हॉस्पिटलायझेशन कव्हरेज, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हर, रुमभाडे माफी आणि बरेच काही अतिरिक्तॲड-ऑन्स उपलब्धआहेत, तुमच्या कव्हरेजचा विस्तार करण्यासाठी तुम्ही निश्चितच निवड करू शकतात.
अखेरीस, ही इन्श्युरन्स पॉलिसी युनिक आणि आवश्यकता दोन्हींसाठी उपयुक्त आहे. कारण ती अपघातांसाठी विशेषत: डिझाईन केलेले व्यापक कव्हरेज ऑफर करते. अपघात किरकोळ किंवा गंभीरअसो त्यामुळे लक्षणीय आर्थिक भार सहन करावा लागू शकतो. योग्य इन्श्युरन्स असल्याने तुम्हाला या आकस्मिक खर्चापासून योग्य संरक्षित मिळण्याची सुनिश्चिती केली जाते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 2022 च्या रस्त्यावरील अपघातांचा अहवाल या जोखमीची गंभीरता अधोरेखित करतो. देशभरात 4,61,312 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे 1,68,491 व्यक्तींना दुर्देवी मृत्यूला सामोरे जावे लागले आणि 4,43,366 लोकांना दुखापत झाली. या आकडेवारी मधून अपघातांचे आकस्मिक स्वरुप आणि व्यक्ती आणि कुटुंबांवरील संभाव्य भावनिक आणि आर्थिक अस्थिरता अधोरेखित होते. आयुष्य अनिश्चितता पाहायला मिळते. रस्त्यावर, घरी किंवा कामावर असो अशा स्थितीत इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये ज्यामध्ये अपघातांसाठी कव्हरेज समाविष्ट आहे. निश्चितच वरदान ठरते.