• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ByEditor

Feb 25, 2025

मुंबई : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेंद्र निंबाळकर, संजय यादव, डॉ. राजेंद्र भारुड, दीपक कुमार मीना, समीर कुर्तकोटी, महेश आव्हाड आणि कीर्ती किरण पुजार या अधिकाऱ्यांचे बदल्या करण्यात आल्या आहे.

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, राजेंद्र निंबाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई येथे कार्यरत होते. तर संजय यादव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर दीपक कुमार मीना, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समीर कुर्तकोटी यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई यांना महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर गेल्या दोन महिन्यात 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

1) राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2) संजय यादव (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3) डॉ. राजेंद्र भारुड (IAS:RR:2013) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4) दीपक कुमार मीना (IAS:RR:2013) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5) समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6) महेश आव्हाड (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7) कीर्ती किरण पुजार (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!