प्रतिनिधी
तळा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २.० मोहिमे अंतर्गत शनिवार, दि. १ मार्च २०२५ रोजी आरबीएसके टीम तळा मार्फत राजिप शाळा तळा येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी व शाळांमधील ० ते १८ वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची आरबीएसके वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सक अधिकारी यांच्या मार्फत नेत्र तपासणी करण्यात आली.


सदर कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय तळा डॉ. विष्णु ढगे, अंगणवाडी पर्यवेक्षक यशवंती राऊत, नेत्रचिकित्सक अधिकारी सुप्रीया पाटील, राजिप शाळा तळा येथील शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व आरबीएसके पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. सचिन गोमसाळे (वैद्यकीय अघिक्षक ग्रामीण रुग्णालय तळा), डॉ. वंदनकुमार पाटील (तालुका आरोग्य अधिकारी, तळा), दिपाली शेळके (बालविकास प्रकल्प अधिकारी तळा), सुरेखा तांबट (गटशिक्षण अधिकारी, तळा), मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, शिक्षिका मितल वावेकर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
