• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पंढरपूरच्या मंदिर मुख्य गाभाऱ्यातील जतन संवर्धन काम 5 जूनपर्यंत होणार पूर्ण

ByEditor

Mar 11, 2025

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची 6 वर्षापूर्वी रासायनिक लेप प्रक्रिया झाली आहे. दीड महिन्यापूर्वी पुरातत्व विभाग पथकाने मूर्तींची पाहणी केली त्यात काही ठिकाणी झीज झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी रासायनिक लेप लावावा लागेल असा अहवाल देण्यात आला आहे. 5 जून पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुख्य गाभारा मधील जतन संवर्धन काम पूर्ण होणार आहे. गाभाऱ्यात कोटींग कामासाठी दर्शन वेळेत बदल होऊ शकतो.मंदिर समिती विधी व न्याय विभागच्या सल्ल्यानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, सध्या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यामध्ये गाभारा, अंतराळ, चौखांबी, सोळखांबी याची कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला दिला आहे. दगडी कामास कोटिंग करणे, वॉटरप्रूफिंगची कामे पावसाळ्यापूर्वी करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिर्डी आणि तिरुपतीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन सुविधा मंदिर समितीतर्फे नियोजित आहे. ही सुविधा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर भाविकांना दर्शनाची नेमकी तारीख, वेळ अगोदरच समजेल. त्यामुळे त्यांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. यासाठीचे काम काम ‘टीसीएस’ कंपनीला देण्यात आले आहे. या संदर्भात कंपनीचे अधिकारी आणि समितीचे विश्वस्त यांच्यामध्ये बैठक झाली असून संबंधित कंपनी लवकरच प्रात्यक्षिक सादर करणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक होणार आहे. सुरक्षा आणि तांत्रिक बाबींचा विचार करून ही सुविधा आषाढी यात्रेला देण्याचा विचार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माहिती दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!