• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रद्धांजली चषक टी- २० क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघ अंतिम विजयी

ByEditor

Mar 20, 2025

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित केलेल्या श्रद्धांजली चषक टी-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघानी अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघानी दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा संघाचा ३ धावांनी प्रभाव करून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. ५० हजार व आकर्षक चषक जिंकले.

प्रथम फलंदाजी करताना पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघाने २० षटकांमध्ये ७ गडी गमावत १५९ धावा फलकावर नोंदवल्या. योगेश पवार यांनी सर्वाधिक ४३, प्रतिक म्हात्रे यांनी ३० धावांचे योगदान दिले. रोहा संघाकडून तेजस मोहिते यांनी ४ फलंदाज बाद केले. रोहा संघाकडून आयुष माळी ३४ व सुमित म्हात्रे यांनी ३७ धावा काढल्या. पेण संघाकडून कौस्तुभ म्हात्रे, अभिषेक खातू, देवांश तांडेल व रमाकांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. शेवटच्या षटकात रोहा संघाला जिंकण्यासाठी ७ धावांची गरज असताना कौस्तुभ म्हात्रे यांनी अवघा ३ धावा दिल्या. रोहा संघानी ८ गडी बाद १५६ धावा केल्या असून पेण संघानी सामना ३ धावांनी जिंकला.

बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे, प्रसिद्ध उद्योजक राजू पिचिका, अतुल वनगे, आरडीसीएचे खजिनदार प्रशांत ओक, शाम पाटील, देवा पाटील, भाई देशपांडे, रवी तांडेल, दिनेश सावंत, मनोज कुलकर्णी, भूषण मोरे, विवेक ठाकूर, प्रदीप पाटील, मनोहर अहिर, प्रसाद पवार, रवी साळवी, प्रवीण आंद्रे, सुरेंद्र भातिकरे, सागर बोबड, शेखर भगत यांच्यासह खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!