• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वाहनचालकांना मोठा दिलासा, HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ

ByEditor

Mar 21, 2025

मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) अर्थात एचएसआरपीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून झाली आहे.

त्यामुळे ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ही नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांच्या नावाने यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 मार्च आणि त्यानंतर 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळी देण्यात आलेली ही तिसरी मुदतवाढ आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख वाहनांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज आहे.

• HSRP नंबर प्लेटला एक युनिक पिन नंबर असतो.
• गाडीच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर युनिट पिन नंबर असतो.
• इतर रजिस्ट्रेशन मार्क गाडीच्या पुढच्या काचेवर लावलेला असतो.
• या पिन नंबरची वाहन प्रणालीत माहिती असते.
• या पिन नंबरवरून वाहनाची माहिती मिळवता येते.
• या नंबर प्लेटला लावलेले स्क्रू काढून पुन्हा लावता येत नाहीत. त्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे, यासारख्या गोष्टींना आळा बसतो.

• मोटर सायकल – 450 रुपये + जीएसटी
• ट्रॅक्टरसाठी – 450 रुपये + जीएसटी
• थ्री व्हीलरसाठी – 500 रुपये + जीएसटी
• फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी – 745 रुपये + जीएसटी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!