• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तुमच्या मोटर इन्श्युरन्स क्लेमसाठी सुलभ गाईड

ByEditor

Mar 24, 2025

लेखक : टी. ए. रामलिंगम,
मुख्य तांत्रिक अधिकारी,
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स

पली मोटर वाहने आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपण त्यावर खूप अवलंबून असतो. आज महामारीच्या पार्श्वभूमीवर, लोक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक आणि कॅब सेवा टाळत आहेत. त्यामुळे वैयक्तिक वाहनांवर अधिक अवलंबून राहिले जात आहे. जर तुमच्याकडे वाहन असेल तर बहुधा तुमच्याकडे सर्वसमावेशक मोटर इन्श्युरन्स कव्हर किंवा किमान थर्ड पार्टी कव्हर असेल जे कायद्यानुसार अनिवार्य आहे. मोठ्या संख्येने लोक वैयक्तिक वाहने खरेदी करत असल्याने, मोटर इन्श्युरन्स हे सर्वात जास्त मागणी असलेले इन्श्युरन्स प्रॉडक्ट बनले आहे ज्यामुळे दरवर्षी त्यात मोठ्या प्रमाणात क्लेम देखील दिसतात.

आपल्यापैकी बहुतेक जणांसमोर जेव्हा आपला पहिला मोटर क्लेम येतो तेव्हा आपण गोंधळून जातो. या लेखाचा उद्देश मोटर इन्श्युरन्स क्लेमविषयी समजून घेण्यास वाचकांना मदत करणे हा आहे.

क्लेमचे प्रकार

मोटर इन्श्युरन्स क्लेम सामान्यपणे दोन कॅटेगरीमध्ये वर्गीकृत केले जातात – कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट क्लेम.

कॅशलेस क्लेम – कॅशलेस क्लेम अंतर्गत, तुमच्या वाहनाचे नुकसान झाल्यास आणि पुढील दुरुस्तीची आवश्यकता असल्यास तुम्हाला कोणताही आगाऊ खर्च सोसावा लागत नाही. इन्श्युरर त्याच्या नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी झालेला खर्च थेट देय करतो. जेव्हा लागू असेल तेव्हा तुम्हाला म्हणजे कस्टमरला केवळ डेप्रीसिएशन आणि वजावट भरावी लागेल. डेप्रीसिएशनची टक्केवारी कारचे वय आणि भागानुसार बदलते. उदाहरणार्थ, फायबर ग्लास पार्टमध्ये 30% डेप्रीसिएशन आहे. त्यामुळे जर हा विशिष्ट भाग खराब झाला असेल आणि बदलणे आवश्यक असेल तर इन्श्युरर खर्चाच्या 70% देय करेल आणि उर्वरित 30% पॉलिसीधारकाला भरावे लागतील. वजावट म्हणजे इन्श्युरन्स कव्हर सुरू होण्यापूर्वी इन्श्युअर्डला भरावयाची रक्कम. समजा अनिवार्य वजावट रु. 2,000 आहे आणि इन्श्युअर्डचा क्लेम रु. 6,000 आहे, तर इन्श्युअर्डला पहिले रु. 2,000 भरावे लागतील आणि इन्श्युरर उर्वरित रु. 4,000 भरेल.
एकंदरीत, कॅशलेस सेटलमेंट ही पॉलिसीधारकासाठी एक सुरळीत आणि त्रासमुक्त प्रक्रिया आहे.

रिएम्बर्समेंट क्लेम – रिएम्बर्समेंट क्लेम अंतर्गत, तुमच्या वाहनाचे कोणतेही नुकसान झाल्यास, तुम्ही कोणत्याही गॅरेजमध्ये (नेटवर्क गॅरेजच्या बाहेर) तुमचे वाहन दुरुस्त करून घेऊ शकता. तुम्हाला दुरुस्तीचा खर्च सोसावा लागेल आणि नंतर इन्श्युररकडे रिएम्बर्समेंटसाठी अप्लाय करावे लागेल. तुम्ही वर्कशॉपमधून सर्व दुरुस्ती पावत्या आणि बिल घेतल्याची खात्री करा. क्लेम डॉक्युमेंट्स आणि बिल प्रमाणित केल्यानंतर इन्श्युरर पेमेंट करेल.

घटनेवर आधारित मोटर इन्श्युरन्समध्ये तीन प्रकारचे क्लेम आहेत:-

• थर्ड पार्टी दायित्व
• ओन डॅमेज
• चोरी

थर्ड पार्टी (टीपी) – थर्ड पार्टी हे भारतातील कायद्यानुसार अनिवार्य कव्हर आहे. टीपीचा उद्देश तुमच्या वाहनामुळे झालेल्या नुकसान किंवा दुखापतीमुळे थर्ड पार्टीने क्लेम केलेल्या कायदेशीर दायित्वासाठी कव्हरेज प्रदान करणे हा आहे. टीपी सेक्शन तुम्हाला किंवा तुमच्या वाहनाला कोणतेही कव्हर प्रदान करत नाही. टीपी सेक्शन अंतर्गत, तुमच्या वाहनामुळे थर्ड पार्टीला दुखापत, प्रॉपर्टीचे नुकसान किंवा मृत्यू झाल्यास थर्ड पार्टी भरपाईसाठी क्लेम करू शकते. मृत्यू किंवा दुखापतीच्या बाबतीत भरपाईवर कोणतीही मर्यादा नाही, रक्कम न्यायालयाद्वारे ठरवली जाईल. जर तुम्ही अपघातात थर्ड पार्टी असाल तर तुम्हाला त्वरित एफआयआर दाखल करावा लागेल आणि वाहन मालकाकडून टीपी इन्श्युरन्स तपशील कलेक्ट करावा लागेल. तुम्हाला मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल (एमएसीटी) मध्ये भरपाईसाठी दाखल करावे लागेल. तुम्ही जिथे राहता तिथे किंवा अपघात झालेल्या क्षेत्रात क्लेम दाखल करू शकता.

तुम्ही दाखल करू शकणारे प्रमुख क्लेम पुढीलप्रमाणे:-

• शारीरिक विद्रूपणासाठी भरपाई
• अपंगत्वामुळे कमाईच्या नुकसानीसाठी भरपाई
• वैद्यकीय खर्च
• प्रॉपर्टीचे नुकसान
• अपघातामुळे तुमच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमध्ये तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती भरपाईसाठी दाखल करू शकतात

ओन डॅमेज (ओडी) – जेव्हा तुमचे वाहन अपघातामुळे नुकसानग्रस्त होते तेव्हा ओडी क्लेम ट्रिगर होतात. पहिली पायरी म्हणजे पोलिस आणि तुमच्या इन्श्युररला सूचित करणे. तुम्ही पोलिस आणि इन्श्युररच्या संमतीशिवाय अपघातस्थळातून तुमचे वाहन हलवू नये. तुम्हाला अपघातस्थळातून वाहन काढून टाकण्यास संमती मिळाली की, तुम्ही वाहन रिस्टोरेशनसाठी नेऊ शकता आणि इन्श्युरर कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट आधारावर पेमेंट करेल.

चोरी – तुमचे वाहन चोरीला गेल्यास तुम्हाला पोलिसांकडे एफआयआर रजिस्टर करणे, इन्श्युरर आणि आरटीओला चोरीविषयी सूचित करणे आवश्यक आहे. तुम्हाला इन्श्युररकडे एफआयआर, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इ. ची कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे. पोलिस या प्रकरणाची तपासणी करतील, तथापि, जर तुमचे वाहन 90 दिवसांच्या आत शोधले गेले नाही तर पोलिस नो ट्रेस रिपोर्ट जारी करतील. चोरीच्या बाबतीत क्लेम सेटल करण्यासाठी नो ट्रेस रिपोर्ट अनिवार्य आहे. तुम्ही आवश्यक डॉक्युमेंट्ससह रिपोर्ट सबमिट केल्यानंतर, इन्श्युरर क्लेम सेटलमेंटसाठी प्रोसेस सुरू करेल.

डिजिटाईज्ड क्लेम प्रोसेस

इन्श्युरन्स इंडस्ट्री जलदपणे डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहे आणि वेगवान क्लेम सेटलमेंटसाठी वैज्ञानिक ॲप्लिकेशन्सच्या माध्यमांचा वापर करीत आहे. क्लेम सेटलमेंटमध्ये अशा एक इनोव्हेशनला स्पॉट सेटलमेंट म्हणतात जे इन्श्युररच्या ॲप्स किंवा वेबसाईटद्वारे केले जाते. इन्श्युअर्डला फक्त त्यांच्या वाहनाच्या नुकसानीचे फोटो काढणे आणि ते इन्श्युररच्या ॲप किंवा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. इन्श्युरर या फोटो आणि डाटा ॲनालिटिक्स टूल्सचा वापर करतात आणि क्लेम रक्कम ठरवतात, जी इन्श्युअर्डला स्वीकार्य असल्यास, 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात सेटल केली जाऊ शकते. अशा इनोव्हेशनसह, इन्श्युअर्ड कमी टर्नअराउंड वेळेसह सहजपणे त्यांचा क्लेम सेटल करू शकतात आणि कोणत्याही आर्थिक त्रासाशिवाय त्यांचे वाहन दुरुस्त करून घेऊ शकतात.

शेवटी मी असे म्हणेन की, एक सुरळीत आणि त्रासमुक्त क्लेम प्रोसेस कस्टमरसाठी अतिशय दिलासादायक असते. जेव्हा तुम्ही तुमच्या इन्श्युररचे मूल्यांकन करत असाल तेव्हा हा एक फरक पाडणारा घटक असू शकतो. सुरक्षितपणे ड्राईव्ह करा, तुमच्या राईडचा आनंद घ्या आणि दुर्दैवी अपघाताच्या बाबतीत, नेहमीच तुमच्या इन्श्युररशी संपर्क साधा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!