• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार, राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यासह 7 जणांना अटक

ByEditor

Apr 9, 2025

पुणे : पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

पीडित महिला 2020 पासून पुण्यात राहत असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याचा समावेश असून त्याचे नाव शंतनु कुकडे असे आहे. त्याच्यासोबत ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड. विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी सात जणांना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे. शंतनु कुकडे याच्यावर याआधी देखील दोन वेगवेगळ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण नोंदवले गेले आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान या नव्या घटनेची माहिती समोर आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी लगेचच कारवाई करत आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

भूतानमधून आलेली ही महिला बोधगया येथे 2020 साली भारतात आली होती. पुढील शिक्षण आणि नोकरीसाठी ती पुण्यात स्थायिक झाली. यावेळी तिची ओळख ऋषिकेश नवले याच्याशी झाली आणि त्यानेच तिची ओळख शंतनु कुकडे याच्याशी करून दिली. कुकडे याने तिला पुण्यात राहण्यासाठी घर दिले आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. परंतु ह्याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर कुकडेने पीडितेची ओळख आपल्या इतर मित्रांसोबत करून दिली. पार्टीच्या निमित्ताने हे सर्व आरोपी वारंवार तिच्या घरी येत असत. यातील एकजण डीजे असून दुसरा पेशाने वकील आहे. लोणावळा, रायगड आणि पानशेत या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली आरोपींनी तिच्यावर पाळत ठेवत वेळोवेळी अत्याचार केले. मैत्रीचे नाटक करीत तिचा विश्वासघात करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!