कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय. 15 दिवसांनंतर कोरटकर जेलबाहेर येणार आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. छत्रपतींचा वामान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची जामीन मिळविण्यासाठी धावाधाव करत होता. कोल्हापूर दिवाणी न्यायालयानंही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकरच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
महापुरुषांचा अवमान करणा-या प्रशांत कोरटकरच्या जामिनाचा मार्ग दिवाणी न्यायालयानं बंद केल्यानंतर आता कोरटकरनं जामीन मिळवण्यासाठी धावाधाव केली. प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी तातडीनं सत्र न्यायालयात अर्ज करण्यासाठी कागदपत्रं मिळवण्यासाठी बरीच धावाधाव केली. प्रशांत कोरटकरला अटक केल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रशांत कोरटकर कोठडी टाळण्याचा प्रयत्न करत होता. फरार असताना तो अटकपूर्वसाठी धडपड करत होता. अटक झाल्यानंतरही त्याच्या वकिलांनी पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद केला. कोर्टानं दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली तेव्हाही त्यानं जामिनासाठी प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही व्यर्थ गेला होता.
प्रशांत कोरटकर देशाबाहेर पळून जाईल त्यामुळे पोलिसांनी कोरटकरचा पासपोर्ट जप्त करावा असा अर्ज इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी केला होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घेतला होता. प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला होता. यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यादरम्यान याचिकेची प्रत उपलब्ध नसल्याने कोर्टाने सोमवारी सुनावणी ठेवली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी देवून महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य केलेच्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे प्रशांत कोरटकर याचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
