जालना : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थांवर अक्षरशः गाव विकण्याची वेळ आहे. गावात वेगवेगळ्या ठिकाणी गाव विकण्या संदर्भात बॅनर, पोस्टर सगळीकडे लावले आहेत. ग्रामस्थांनी एवढं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं अशी चर्चा सगळीकडे होत आहे.
जालन्यातील कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थासह माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विक्रीला काढली आहे. गावकऱ्यांनी ”पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत विकणे आहे’ अशा आशयाचे पोस्टर गावात लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरपंच, उपसरपंच हे गावात विहीर आणि घरकुल वाटप करतांना भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला वैतागलेल्या गावकऱ्यांनी संपूर्ण गावात ग्रामपंचायत विक्रीला असल्याचे बॅनर सगळीकडे लावले आहेत.
दरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करण्याच्या तयारीत असल्याचा ईशारा माजी उपसरपंचांनी दिला आहे. एवढंच नव्हे पुढे ते म्हणाले की, जर यामध्ये बदल झाला नाही तर गावकरी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला आहे.