• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के

ByEditor

Apr 3, 2025

सोलापूर : जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे, सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. साधारणपणे आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!