• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात कंटेनरचा अपघात; वाहतूक मार्गात बदल

ByEditor

Aug 2, 2023

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्यात एक कंटेनर आडवा झाल्याने संपूर्ण बोगदा बंद झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील बोगद्यात ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजता घडली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच आयआरबी व देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे मात्र त्यांना सुद्धा घटनास्थळी जाताना अमृतांजन पुलापर्यत जाऊन उलट्या दिशेने जावे लागले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. दरड काढण्यासाठी एमएसआरडीसी आणि प्रशासनानं ट्रॅफिक ब्लॉक घेऊन दरड हटवली होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरु करण्यात आली होती. या मार्गावर जिथे दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाळ्या लावण्याचे काम देखील करण्यात आले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!