• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रतीक्षा संपली! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, कोणत्या साईटवर पाहता येणार निकाल?

ByEditor

May 4, 2025

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या १२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईनद्वारे जाहीर केला जाणार आहे. आपल्याला हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

अनेक दिवसांपासून विविध तारखा समोर येत होत्या. मात्र, बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती दिली. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर तयार ठेवावा.

कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकणार विद्यार्थी

http://hscresult.mkcl.org

http://hscresult.mkcl.org

mahahssboard.in

Results.targetpublications.org

Results.navneet.com

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!