• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला…ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

ByEditor

May 7, 2025

मुंबई: १९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अभिनेते माधव वझे यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’श्यामची आई’ या चित्रपटामुळं प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे एक उत्तम नट होते. तसंच त्यांचा रंगभूमीचा अभ्याससुद्धा अतिशय दांडगा होता. अभिनयासोबत शिक्षण क्षेत्रातही ते कार्यरत होते. पुण्यातील वाडीया महाविद्यालयातून ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.

१९५३ सालच्या श्यामची आई चित्रपटातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या या भूमिकेचे खूप मोठे कौतुक झालं होतं.यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून काही मोजके चित्रपट केले. बापजन्म,३ इडिअट्स, डिअर जिंदगी, एवढंस आभाळ अशा हिंदी, मराठी चित्रपटात ते झळकले. हॅम्लेट या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन देखील केलं होतं. पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले होते. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी , नंदनवन अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!