नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल 2025ला आठवड्याभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सूपर लीग दुबईत शिफ्ट करण्याची तयारी केली होती.पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिल्पोमेसीमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. कारण युएईतील पीएसएलचे आयोजन बंद पाडण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानने देखील पाकिस्तान सुपर लीग बंद केली होती. पाकिस्तान सुपर लीगचे 8 सामनेच उरले आहेत.त्यामुळे उर्वरीत पीएसएलचे सामने दुबईत खेळवण्यासाठी आयोजन करण्यात येणार होते. मात्र युएईमधील पीएसएलच्या या आयोजनाला ईसीबीने मान्यता देण्याची शक्यता कमी आहे,असे ईसीबीच्या जवळच्या सूत्रांनी माहिती मिळते आहेत.त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का आहे.
