मुंबई : शालेय शिक्षण घेत असल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सगळ्यांना माहिती असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे प्रताप लहानपणापासून आपल्या कानावर पडत असतात. अलिकडच्या काळात सोशल मीडियामुळे महाराजांचे प्रताप हे सिनेमा, कार्टून्स, खेळ यासारख्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत पोहोचले आहेत. शाळेत जाण्याआधीच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हे कळलेलं असतं. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? राज्याभिषेक कुठे झाला? मृत्यू कुठे झाला? हे सगळं आजकालची अनेक लहान मुलं एका फटक्यात सांगू शकतात. पण एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका शिक्षिकेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला या प्रश्नाच उत्तर देता आलं नाही.
कोण होणार करोडपती हा प्रसिद्ध शो सध्या मराठी टेलिव्हिजनवर सुरू आहे. अभिनेते सचिन खेडेकर या शोचं सुत्रसंचालन करत असतात. विविध क्षेत्रातील लोक कोण होणार करोडपतीच्या हॉटसीटवर बसत असतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये एका महिला स्पर्धकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला या प्रश्न उत्तर देण्यासाठी लाइफ लाइन घ्यावी लागली. सोशल मीडियावर या महिला स्पर्धकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.हेही
कोण आहे ती महिला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावर झाला हे उत्तर देत न येणाऱ्या त्या महिला स्पर्धकाचं नाव ज्योती मचे असं आहे. ज्योती या माध्यमिक शिक्षिका आहेत. MSC B.ed पर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. त्या सध्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. 8 ऑगस्ट 2023 रोजी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये ज्योती मचे फास्टेस फिंगर फर्स्ट जिंकून हॉटसीटवर बसल्या होत्या.कोण होईल मराठी करोडपती मध्ये,प्रश्न – छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?उत्तर देणारी ज्योति माध्यमिक शिक्षक.. शिक्षण Msc B.ed…उत्तर देता देण्यासाठी Lifeline घ्यावी लागली.
ज्योती यांना 10 हजारांचा टप्पा पार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र प्रश्न आणि त्याचे पर्याय पाहून त्या कमालीच्या गोंधळल्या आणि त्यांनी ‘व्हिडीओ अ फ्रेंड’ ही लाईफ लाईन घेऊन आपल्या मित्राला या प्रश्नाचं उत्तर विचारलं. पेशाने इंजिनिअर असलेल्या अमर मरकड यांनी “मला रायगड वाटतंय” असं उत्तर दिलं.या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिला शिक्षिकेची अनेकांनी अक्कल काढत ट्रोल केलं आहे.
महाराष्ट्र तुला उद्या आयुष्यामध्ये कधी साथ देणार नाही
तुम्ही शिक्षिका पद सोडून द्या
तुम्ही शिक्षिका पद सोडून द्या तुम्हाला शिक्षिका पद दिल कोणी
देणारा पण
पेशाने एक शिक्षिका आहात आणि महाराजांच्या महाराष्ट्रात राहुन महाराजांबद्इदल इतकीही माहिती नसावी म्हणजे कमालच आहे तुमची…..
अशा लोकांना मराठी म्हणण्याचा व शिक्षक होण्याचा काहीही अधिकार नाही.
महाराजाचा आदर्श समोर टेवा. श्रीचा आदर करा.मोठ्या स्टेज समोर गोंधळी ती.
फुटक नशीब म्हणायचं हिच
अडाणी माणस परवडली त्यापेक्षा
शेतकरांच्या रानात जाऊन कोण बनेगा करोड पाटी बनवा
मंद बुद्धी ची कुठली शाळेत काय शिकवत असेल❓
तिची टी ई टी पास आहे का?
Krupaya Gairsamaj nako. Tyana uttar mahitee hote. Phakta confirm karnya sathee tyanee life line ghetali. Aani history madhe khup ghadamodee hote astaat. Tymule sambhram hoau shakto.tyatt ewadha issue karnyasarkha kay garaj nahee.
Raigad