कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कोनगाव परिसरात राहणारा 27 वर्षीय आनंद शामबाबु गुप्ता हा तरुण 11 नोव्हेंबरपासून बेपत्ता असून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नोंद क्र. मानव मिसिंग रजिस्टर नं. 79/2025 प्रमाणे या प्रकरणी तपास सुरू आहे.
शामबाबु देवीप्रसाद गुप्ता (वय 58), पाणिपुरी विक्रेता, यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबासह ते मागील 30 वर्षांपासून आनंद रीजेन्सी, G विंग, कोनगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा धाकटा मुलगा आनंद गुप्ता हा मनिशा डेअरी, चिकणघर (होली क्रॉस शाळेजवळ) येथे पाणिपुरी विक्रीचा व्यवसाय करतो.
11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कामावर जाण्यासाठी पिता-पुत्र घरातून एकत्र निघाले. वडिलांना सुनिल क्रिडा मंडळ, संतोषी माता रोड, कल्याण पश्चिम येथे उतरवून आनंद सकाळी 11 वाजता आपल्या कामाच्या ठिकाणी निघून गेला. दुपारी 3.30 वाजता त्यांचा मोठा मुलगा सूरजच्या मित्राने फोन करून आनंद कामावर न आल्याची माहिती दिली.
कुटुंबीयांनी अनेकदा आनंदच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन बंद येत होता. नंतर त्याच्या कामाच्या ठिकाणी, राहत्या परिसरात तसेच कल्याण रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही.
हरविलेल्या तरुणाचे वर्णन
नाव: आनंद शामबाबु गुप्ता
वय: 27 वर्षे
उंची: 4.5 फूट
रंग: सावळा
अंगरचना: मध्यम
चेहरा: गोल
केस: काळे, वाढलेले
कपडे: हिरव्या रंगाचा हाफ टी-शर्ट, काळी टूप पॅन्ट
भाषा: हिंदी/मराठी
11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता कल्याण-पश्चिम येथून तो कामासाठी निघाल्यानंतर अद्याप घरी परतलेला नाही. त्यामुळे कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस हवालदार कोळी यांच्याकडे सोपवला आहे.
कोणाला आनंद गुप्ता याबाबत माहिती असल्यास ती संबंधित भिवंडी पोलीस ठाण्यास कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
