• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाली येथे उद्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन; डॉ. भट नर्सिंग होम व बल्लाळेश्वर देवस्थानचा संयुक्त उपक्रम

ByEditor

Jan 31, 2026

​पाली (प्रतिनिधी) : रोहा येथील प्रसिद्ध डॉ. भट नर्सिंग होम आणि श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असून, गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य उपचार मिळण्याची ही मोठी संधी आहे.

​हे शिबिर पाली येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या जुन्या कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये हाडांच्या शस्त्रक्रिया (Orthopedic), कान-नाक-घसा (ENT), मुतखडा (Urology), कॅन्सर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी यांसारख्या गंभीर आजारांवर मार्गदर्शन व उपचार केले जातील. योजनेच्या निकषात बसणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.

​या शिबिरासाठी तज्ज्ञ सर्जन डॉ. अपूर्व भट (MBBS, MS), अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभिषेक रापते (MBBS, D Ortho) आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. हर्ष गुजराती (MBBS, DORL) यांची विशेष उपस्थिती असणार असून ते रुग्णांची तपासणी करतील. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. भट नर्सिंग होम आणि बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!