• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​स्व. सुमित पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालिका शाळेला ‘वॉटर पंप’ भेट

ByEditor

Feb 2, 2026

​पेण | विनायक पाटील
पेण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दिवंगत मुलाच्या, सुमित प्रवीण पाटील, वाढदिवसाचे औचित्य साधून पेण पालिका शाळा क्रमांक १ ला पाण्याची मशीन (वॉटर पंप) भेट दिली. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची अनेक दिवसांची समस्या सुटली आहे.

​नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रवीण पाटील यांनी आपल्या प्रभागातील पालिकेच्या मराठी शाळेला भेट दिली होती. यावेळी शाळेत पाणी उपलब्ध असूनही ते वरच्या टाकीत चढवण्यासाठी यंत्रणा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. केवळ पाण्याची मशीन नसल्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे समजताच, त्यांनी स्वखर्चाने ही मशीन देण्याचा निर्णय घेतला.

​आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही मशीन शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा रणपिसे आणि सहशिक्षिका आर्या पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी विवेक भट, अमिनशेठ खोजा, मनोज विचारे आणि स्वरूप घोसाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​प्रवीण पाटील यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत. आपल्या मुलाच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी एका शैक्षणिक कार्याला मदत केल्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!