• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेवाडीत कोलाड पोलिसांचा ‘रूट मार्च’; निवडणूक काळात शांतता राखण्याचे आवाहन

ByEditor

Feb 5, 2026

कोलाड | विश्वास निकम
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य ‘रूट मार्च’ काढण्यात आला. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.

​हा रूट मार्च कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरून काढण्यात आला. यात प्रामुख्याने ​संजय नगर ते मच्छी मार्केट, ​बँक ऑफ महाराष्ट्र ते रोहा रोड, ​आंबेवाडी स्टॉप ते प्रभाकर हॉटेल ​शेवटी कोलाड पोलीस ठाणे येथे समारोप करण्यात आला.

​कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. या पथकामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि होमगार्डच्या जवानांचा मोठ्या संख्येने समावेश होता. आंबेवाडी बाजारपेठेतून हा मार्च जात असताना पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत शिस्त पाळण्याचे आवाहन केले.

​निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनी ​”सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही व्यक्तीने जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.” अशा सूचना दिल्या आहेत.

​या रूट मार्चमुळे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला, ज्यामुळे समाजकंटकांवर वचक निर्माण होण्यास मदत झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!