• Thu. Mar 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अभिमानास्पद! रायगडच्या पोलीस शिलेदाराची खो-खोत राष्ट्रीय स्तरावर ‘रजत’ भरारी

ByEditor

Mar 26, 2026

रेवदंडा | सचिन मयेकर
जम्मू-काश्मीर येथे संपन्न झालेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारात रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई शनिराज हारगे यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदकावर आपले नाव कोरले आहे. शनिराज हारगे यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

​या यशामागे रायगड पोलीस दलाचे स्पोर्ट्स इन्चार्ज, पोलीस हवालदार ऋषिकेश साखरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना मिळालेले दर्जेदार प्रशिक्षण आणि नियोजित सरावामुळेच राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन करणे शक्य झाले. शनिराज हारगे यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण रायगड जिल्हा पोलीस दलात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!