अलिबाग: विशेष प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून, एकूण ३५ शाळांवर ‘अनधिकृत’ असा शिक्का मारला आहे. आपल्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश निश्चित करू नये, असे जाहीर आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी केले आहे.
तालुकानिहाय अनधिकृत शाळांची संख्या
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पनवेल तालुक्यात सर्वाधिक अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे:
पनवेल: २२ शाळा
श्रीवर्धन: ०३ शाळा
म्हसळा: ०३ शाळा
खालापूर: ०२ शाळा
अलिबाग: ०२ शाळा
कर्जत, उरण, महाड: प्रत्येकी ०१ शाळा
आरक्षणानुसार कठोर कारवाईचे संकेत
ज्या शाळांनी शासनाची मान्यता न घेता किंवा नियमांचे उल्लंघन करून ज्ञानार्जन सुरू ठेवले आहे, अशा शाळांवर शिक्षण विभागाच्या वतीने आरटीई (RTE) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ललिता दहीतुले यांनी स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय अनधिकृत शाळांची यादी:
- पनवेल: आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल (विचुंबे), न्यू इंग्लिश स्कूल (नेरे), एसजीटी इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), दि वृद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल (ओवळे-दापोली), सनराईज इंग्लिश स्कूल (वावंजे), लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल (वावंजे), नवजीवन इंटरनॅशनल स्कूल (खारपाडा), सेंट ग्रेगोरियस हायस्कूल (शिरढोणपाडा), आॅक्सफोर्ड इंग्लिश स्कूल (कळंबोली), मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल (ओवे), काळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल (पाचनंद), अर्कम इंग्लिश स्कूल (तळोजा), द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल (तळोजा), ओशियन ब्राईट काॅन्वेंट हायस्कूल (तळोजा), रोहिंजण इंग्लिश स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल (तळोजा), राईजिंग इंटरनॅशनल स्कूल (कोपर उलवे), एसएमबी इंटरनॅशनल स्कूल (उलवे), शाहीर बाळाराम पाटील इंग्लिश स्कूल (शेडुंग), लक्ष्मी पब्लिक स्कूल (सांगडे).
- श्रीवर्धन: किड्स पॅरेडाईस प्रि-स्कूल (आराठी), इंपेरिअल स्कूल (अयार मोहल्ला), अंजुमन इस्लाम जंजिरा (रानवली).
- म्हसळा: अल इहसान इंग्लिश स्कूल, इतकान इंग्लिश स्कूल (गोंडघर), ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल (मेंदडी).
- खालापूर: सेंट मेरी स्कूल (कोपरी), भारती अॅकेडमी अॅण्ड ज्युनियर काॅलेज (खोपोली).
- अलिबाग: ज्ञानार्जन प्रि-प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल (बोडणी), एमएसटी इंटरनॅशनल स्कूल (बोडणी).
- कर्जत: सेंट औरा ई-टेक्नो स्कूल (बांधिवली).
- उरण: नागराज स्कूल (बोरी).
- महाड: लिटील एंजल स्कूल (पानसरी मोहल्ला).
