मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी (25 मे) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.71 रुपयांनी आणि पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपयांनी वाढ झाली आहे.
दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे ₹3 ने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर ₹7.53 ने महाग झाले आहे.
होर्मुज खाडी बंद असल्याने तेल पुरवठा होण्यास समस्या येत आहे. शिवाय आखाती देशात युद्धाचे ढग असल्याने रिफानरीवरही ताण आहे. अनेक देशात लॉकडाऊनही स्थिती आहे. परकिय चलणावरील दबाव कमी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने पुढील 1 वर्षाकरिता खरेदी न करण्याचे आवाहन केले. शिवाय एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा आहे. इराण आणि अमेरिका युद्धाची मोठी झळ भारताला बसताना दिसत आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यान भारताचे अनेक मित्र भारताच्या मदतीला धावले आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणवर आता जगाचा दबाव वाढू लागला आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात हे युद्ध असली तरीही संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
