• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुणे-दिघी राष्ट्रीय महामार्गावर घोणसे घाटात ट्रकला भीषण अपघात

ByEditor

Aug 31, 2023

दैवबलवत्तर म्हणून ट्रक ड्रायव्हर बचावला

वैभव कळस
म्हसळा :
अपघात फेम घोणसे घाटात सिमेंट ट्रकला अपघात झाला असून ड्रायव्हर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण असूनही सुदैवाने ट्रक ड्रायव्हर आणि गाडी वाचली आहे. सरंक्षक भित नसती तर गाडी साधारण ५०० फूट दरीत कोसळली असती.

गाडी क्र. MH O4 EF 2685 हा ट्रक सुमारे २० टन सीमेंट घेऊन पनवेल-माणगाव बाजूकडून म्हसळाकडे येत असता अपघातासाठी कुप्रसीद्ध असलेल्या घोणसे घाटातील केळेवाडी येथील अतीशीघ्र उतार आणि तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून डावीकडे असलेल्या संरक्षक भिंतीवर ट्रक आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आदळला. ड्रायव्हर सतीश शिगवण (वय ३८ रा. मोहा पनेवल, साईबाबा मंदीराशेजारी) याच्या डोक्याला, डाव्या पायाला जखमा झाल्या आहेत. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र खाडे आणि कॉन्स्टेबल घोंगाणे घटनास्थळी पोहचले. जखमी चालकाला ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे नेले. डॉ. शिर्के यांनी परिचारिका प्रेरणा कदम, प्रणाली चांदोरकर यांच्या मदतीने उपचार के. दैवबलवत्तर म्हणून ट्रक ड्रायव्हर आणि ट्रक सुदैवाने वाचल्याची अपघातस्थळी नागरिकांची चर्चा आहे.

केळेवाडी परिसरांतील ५०० मीटर रस्त्यावर सदोष बांधकाम असल्याने गेले काही वर्ष सातत्याने अपघात होत होते. MSRDA कडून झालेल्या काँक्रीटीकरणानंतर संरक्षक भिंतीला मोठे टायर लावण्याचे MSRDA ने ग्रामस्थांना मान्य केले होते. ते केले असते तर अपघाताची भीषणता कमी झाली असती.

अनिल महामुनकर
घोणसे घाट संघर्ष समिती तथा माजी सरपंच देवघर, ता म्हसळे.

या ५०० मीटर अपघात प्रवण क्षेत्रांत अती गंभीर ते मध्यम स्वरूपाचे सुमारे ३० अपघात झाले आहेत. यामध्ये ८ ते १० मयत, २० गंभीर जखमी, ३० मध्यम स्वरुपांचे जखमी झाले आहेत. MSRDA ने अंत न पहाता तात्काळ सुधारणा कराव्यात.

महादेव पाटील
माजी सभापती आणि सामाजिक कार्यकर्ते, म्हसळा

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!