• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकण रेल्वेच्या धडकेने १ ठार

ByEditor

Jun 9, 2023

सलीम शेख
माणगाव :
कोकण रेल्वेच्या धडकेने पुरुष जातीचा अंदाजे ३० ते ४० वयोगटातील एक अनोळखी इसम ठार झाला. सदरची घटना गुरुवार, दि. ८ जून २०२३ रोजी १:२५ वाजण्याच्या सुमारास माणगाव रेल्वे स्टेशन ते गोरेगाव रेल्वे स्टेशनच्या दरम्यान स्टोन नं ३१/०० ते ३१/०१ मध्ये रेल्वे रुळावर घडली. याबाबतची खबर राहुल अनिल सुर्यवंशी (वय-३३) कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बल कोलाड रा. वरसगाव ता. रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत अनोळखी इसमास रेल्वेची धडक लागल्याने त्यात त्याचा गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.२४/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!