• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा शहराच्या ४३ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे १७ फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते भूमिपुजन

ByEditor

Feb 15, 2024

वैभव कळस
म्हसळा :
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनील तटकरे, महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत म्हसळा नगरपंचायत म्हसळा शहरासाठी खासकरून ४२.९२ कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

म्हसळा शहराच्या या पाणी पुरवठा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आयोजीत भूमिपुजन कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या मान्यवरांचे स्वागताची जय्यत तयारी म्हसळा नगरपंचायत आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्फत करण्यात आली आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि सर्व नगरसेवक यांनी निमंत्रण पत्रिकेद्वारे केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!