• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला! अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

ByEditor

Feb 21, 2024

मुंबई: आपल्या जादुई आवाजाने रेडिओ श्रोत्यांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध रेडिओ उदघोषक अमीन सयानी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने मुंबईतील गिरगाव भागातील एच.आर. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सयानी यांचे निधन झाल्याची माहिती अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.

अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढल होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसले असायचे. अमीन सयानी यांनी जवळपास 19 हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती.

अमीन सयानी हे भारताचे पहिले रेडिओ स्टार होते. रेडिओ सिलोन (श्रीलंका) वरून १९५०च्या दशकात दर आठवड्यात लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ‘बिना का गीतमाला’ गीतमाला’द्वारे त्यांना देश-विदेशात अफाट प्रसिद्धी मिळवली होती. का याकाळात रेडिओ सिग्नल अतिशय अस्पष्ट असतानाच्या काळात श्रोते आवडीने हा कार्यक्रम ऐकत असत. रेडिओ सिलोनवरून हा कार्यक्रम १९८८ पर्यंत प्रसयासारित झाला. त्यानंतर १९८९ साली कार्यक्रमाचे नाव बदलण्यात आलं होतं. अमिन सयानी यांनी १९८९ ते १९९४ पर्यंत सिबाका गीतमाला हा आकाशवाणीच्या विविध भारती स्टेशनवरून प्रसारित झाला होती. कार्यक्रम अमिन सयानी यांनी झालं. ते १९९४ पर्यंत रेडिओवर आणि मोठमोठ्या सिनेतारकांचे सलाम केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!