• Tue. Jul 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार -अपर मुख्य सचिव (ऊर्जा)

ByEditor

Mar 20, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ रोजी त्यांच्या दालनात मीटिंग घेतली. राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ५ मार्च ते ९ मार्च बेमुदत काम बंद आंदोलन केले होते, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले.

१) हरियाणा राज्यातील कंत्राटदारमुक्त रोजगार करिता ऊपकंपनी बाबतीत अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल. २ ) भरती प्रकीयेमध्ये कंत्राटी कामगारांना वयाची सवलत व २५ मार्क देण्यात येतील. याकरिता भरती प्रकीया थांबविण्यात येईल व फॉर्म भरण्यास मुदत वाढ देण्यात येईल. ३) ८ वी पास आयटीआय व १० वी पास आयटीआयच्या कामगारांना भरती प्रकीयेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. ४) कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून यानुसार सर्व्हीस बेनिफिट देण्यात येईल. ५) वयाच्या ६०व्या वर्षीपर्यंत शाश्वत रोजगाराकरिता आवश्यक त्या तरतूदी, कल्याणकारी योजना राबविण्यात येईल. ६) कामगारांना ऐस्क्रो बँक खात्याद्वारे थेट खात्यात वेतन दिले जाईल. ७) कामगारांना मेडिक्लेम व अपघाती मृत्यू योजनेनुसार लाभ देण्यात येईल. ८) आंदोलनानंतर ज्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही त्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले जाईल.

या मीटिंगमध्ये समितीचे राज्य संघटक सचिन मेंगाळे, उमेश अणेराव, नचिकेत मोरे, कमलेश राणे, राजन भानुशाली, कृष्णा भोयर उपस्थित होते. तीनही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. त्यावेळी पगारवाढ व अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!