किरण लाड
नागोठणे : येथील केएमजी विभाग मराठा आळीतील प्रसिद्ध श्री कानिफनाथ मंदिरामध्ये होळी पंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. 8 एप्रिल रोजी नाथभक्तांचे श्रध्दास्थान श्री कानिफनाथ महाराजांचा कंदुरीचा कार्यक्रम होळी पंचमी उत्सवानिमित्त मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. दिवसभरात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 7 वाजता श्री कानिफनाथ महाराजांच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक भक्तगणांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5 वाजता होमहवन त्याचबरोबर सायं. 6 वाजता कंदुरीचा महानैवेद्य, मिरवणूक व ध्वजारोहणचा कार्यक्रम होणार आहे. सायं.7 वाजता आरती व नाथांच्या ओव्या भक्तीभावात बोलण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8.30 वाजता सर्व नाथभक्तांसाठी, ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कानिफनाथ महाराज नागोठणे विभागातील समस्त नाथभक्तांचे, ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. हिंदू धर्मियांच्या प्रवित्र श्रावण महिन्यात नाथभक्तांचा भक्तीचा मळा श्री कानिफनाथ मंदिरात दरवर्षी फुललेला बघायला मिळतो. उद्या होणाऱ्या कानिफनाथ महाराजांच्या धार्मिक कंदुरीच्या कार्यक्रमासाठी नागोठणे तसेच विभागातील नाथभक्तांनी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ व महिला मंडळ मराठा आळी तसेच श्री कानिफनाथ मित्र मंडळ पंचक्रोशी नागोठणे यांनी केले आहे.