प्रतिनिधी
पेण : येथील पत्रकार किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर हे पूर्वीपासून रेतीचा व्यवसाय करीत होते. सुरूवातीला बैलगाडीतुन रेती व्यवसाय करीत असतानाच त्यांनी आपल्या मेहनतीतून ट्रक खरेदी करून नंतरच्या काळात ट्रकद्वारे ठिकठिकाणी रेती सप्लाय करून आपला संसाराचा गाडा सुरळीतपणे चालवीत आपल्या मुलांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात यशस्वी झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी दि. 15 एप्रिल रोजी उद्धर रामेश्र्वर येथे तर उत्तरकार्य राहत्या घरी दि. 18 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती बांधणकर कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.