• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यात अटीतटीचा सामना, आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच Live Updates

ByEditor

Jun 4, 2024

लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार? याचा फैसला आज होणार आहे.

नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

————————————

बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर

बीडमधून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आघाडीवर असून पंकजा मुंडे पिछाडीवर पडल्या आहेत.

————————————

पंकजा मुंडे आघाडीवर; रावेरमधून रक्षा खडसेंची आघाडी

बीडमधून पंकजा मुंडेंनी प्राथमिक कलामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. 

————————————-

दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर

दिंडोरीमधून भास्कर भगरे आघाडीवर असून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे.

————————————-

गिते आघाडीवर; तटकरे पिछाडीवर

रायगडमधून ठाकरे गटाचे अनंत गिते आघाडीवर असून अजित पवार गटाचे सुनील तटकरे प्राथमिक कलामध्ये पिछाडीवर दिसत आहेत. 

————————————

Amvaravti: अमरावती येथून नवनीत राणा यांची आघाडी

अमरावती येथून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर असल्याची माहिती आहे.

————————————-

Pune : पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर

प्राथमिक कलांनुसार भाजप २२३ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर पुण्यातून

भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहे.

—————————————-

Election Results 2024 Live Updates : बारामतीमधून सुनेत्रा पवार आघाडीवर तर सुप्रिया सुळे पिछाडीवर गेल्या आहेत.

Election Results 2024 Live Updates : बारामती येथे सुरवातीला सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. आता आलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली असून सुप्रिया सुळे या पिछाडीवर असल्याची माहिती आहे.

————————————————

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये इंडिया आघाडीने आघाडी घेतली आहे. इंडिया आघाडी २४ तर एनडीए १५ वर आघाडीवर आहे. कन्नौज, रायबरेली, बाराबंकी येथे भारत आघाडी आघाडीवर आहे. राजनाथ सिंह यांनी लखनौमधून आघाडी घेतली आहे. सिमला मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

—————————————————

मुंबईत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर

Election Results 2024 : मुंबईतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबई मुंबईतून भाजपचे पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे, उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. तर उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून आघाडीवर आहेत. तर ईशान्य मुंबईतून संजय संजय दिना पाटील आघाडीवर आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!