• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांचा घासून विजय, रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव

ByEditor

Jun 4, 2024

मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा अवघ्या 681 मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्यात पहिल्या फेरीपासून जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर यांचा 2424 मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर मैदानात असून त्यांच्यांविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रविंद्र वायकर मैदानात उतरले आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई वायव्य हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय विविध धर्मीय मतदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!