• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी; ९६ हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय

ByEditor

Jun 4, 2024

पुणे : शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत असलेल्या मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे. श्रीरंग बारणे हे ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले आहेत. बारणे यांना ६ लाख ९२ हजार ८३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली आहेत.

मावळ लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. महाराष्ट्रातील प्रमुख लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जात होतं. शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी निवडणूक असल्याने शिवसैनिकांचं या ठिकाणी विशेष लक्ष होतं. २००९ पासून आजतागायत मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा पगडा राहिलेला आहे. आज देखील हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बारणे यांनी सलग तिसरा विजय मिळवत हॅट्रिक केली आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. हे २०२४ मध्ये चित्र बदलेल असं वाटत असतानाच बारणे यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणलेला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!