• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये मुले पळविण्याचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ByEditor

Jun 12, 2024

मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगण्याचे उरण पोलिसांचे आवाहन

अनंत नारंगीकर
उरण :
चिरनेर गावातील रहिवासी महादेव चंद्रकांत डोईफोडे यांच्या कन्येला पळवून नेण्याचा प्रयत्न मंगळवारी अज्ञात इसमाने (दि. ११) केला होता. परंतु, आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे मुले पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा प्रयत्न असफल झाला आहे. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उरण पोलीस मुले पळविणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत.

चिरनेर गावातील रहिवासी असणारे महादेव चंद्रकांत डोईफोडे हे मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ठिक ७-३० च्या सुमारास आपल्या दोन मुलांसह गावातील रस्त्यावर फेरफटका मारायला गेले होते. काही वेळाने ते आपल्या घरी परतत होते. त्यांचा मोठा मुलगा हा घेरी गेला तर वडिलांच्या मागून त्यांची ९ वर्षांची देवश्री ही कन्या चालत येत होती. महादेव डोईफोडे हे घराजवळ गेले असता त्यांची कन्या मागून येताना दिसली नाही. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कन्येच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले निदर्शनास आले. त्याच दरम्यान भयभीत अवस्थेत देवश्री येताना दिसली. यावेळी सदर कन्येने झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच शेजाऱ्यांनी मुले पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला. त्याच रस्त्यावरुन येणाऱ्या भरत राम जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, एक इसम लहान मुलीला उचलून तीचे तोंड दाबून घेऊन जात होता. आम्हाला वाटलं की तो त्या मूलीचा बाप असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. मात्र, सदर मूलीनी काका मला वाचवा अशी ओरड दिली. मी त्या सोड असा आवाज दिला. त्याच दरम्यान सदर मूलीनी त्या इसमाच्या हातावर जोरदार जावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटून पळ काढला. आम्हाला कल्पना नसल्याने आम्ही मुलीच्या मागे धावत आलो. एकंदरी मुलीच्या धाडसामूळे व भरत जाधव या आदिवासी बांधवांमूळे सदर कन्या सुखरूप आपल्या आई वडिलांना पुन्हा सापडली आहे.

या झालेल्या घटनेची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तसेच मुले पळविणाऱ्या इसम हा आपल्या चारचाकी वाहनासह सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी उगले व त्यांचे सहकारी मूले पळविणाऱ्या इसमाचा, टोळीचा शोध घेत आहेत. तरी पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!