• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाडमधील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम महिन्याभरापासून बंद; खातेदारांची गैरसोय

ByEditor

Jun 12, 2024

विश्वास निकम
कोलाड :
कोलाड (वरसगांव) नाका येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम एक महिन्यांपासून बंद असल्यामुळे येथील बँक खातेदारांची गैरसोय निर्माण झाली आहे. यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सद्या शाळा सुरु झाल्या असून शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामेही सुरु केली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग बी-बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करीत आहे. तसेच या बँकेचे एटीएम बंद असल्यामुळे एटीएममधून त्वरित पैसे काढण्यासाठी गैरसोय निर्माण झाली आहे.

व्यापारी वर्गाचे काही व्यवहार ऑनलाईन तर काही व्यवहार रोखीने चालतात. परंतु, एटीएम बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाला पैसे काढतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बँकेत जाऊन बँक खातेदाराला ठराविक वेळेतच पैसे काढता येतात परंतु आधुनिक काळातील धावपळीच्या युगात एटीएम कार्डमुळे कोणत्याही वेळी तसेच कोणत्याही ठिकाणच्या बँकेत जाऊन पैसे काढता येत असले तरी इतर बँकेच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढले तर बँक खातेदाराला जादा चार्जेस भरावे लागत आहेत. यामुळे याचा फटका बँक खातेदाराला बसत आहे. यामुळे कोलाडमधील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम त्वरित सुरु करावे अशी मागणी बँक खातेदार यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!